रोहित पवार म्हणाले अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी राहत्या घरात आत्महत्या केली. त्यानंतर या प्रकरणात अनेक वळणे आली. पोलिसांनी अनेकांची चौकशी केली. परंतु आत्महत्येचे नेमके कारण समोर आले नाही. 

आता या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार आहे. काल सर्वोच्च न्यायालयानं याबद्दलचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर राज्यात राजकीय टीका टिपण्णी सुरु झाली आहे. भाजपच्या नेत्यांनी सरकारला लक्ष केले असून महाविकास आघाडीतील नेते सुद्धा आता मैदानात उतरले असल्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सलग चार ट्विट केले आहेत. ‘अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही’ म्हणत ‘उदात्त’ कार्य केल्याबद्दल भाजपच्या नेत्यांना ‘सांष्टांग दंडवत’ असं म्हणत त्यांनी भाजपला टोला लागावला आहे. आता रोहित पवार यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देताना सुप्रिम कोर्टाच्या निकालाचा आदर असल्याचे म्हटले आहे.

भाजपला शबरीमला मंदीर प्रवेशाच्या निकालाची आठवण करून देत तेव्हा भाजपच्या नेत्यांनी कोर्टाच्या निकालावर केलेल्या टीकेचा आता राज्य सरकारला धारेवर धरणाऱ्यांना विसर पडला आहे. असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे. आमदार रोहित पवार यांनी ट्विट करुन म्हटलंय की, ‘सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा आदर आहे.

सुशांतसिंगला न्याय मिळाला पाहिजे, अशी आमचीही इच्छा आहे. तसंच या प्रकरणात राज्य सरकार व मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीचा मला आदर असून माझा या संस्थेवर पूर्ण विश्वास आहे. तसेच शबरीमला मंदिर प्रवेशाच्या निकालावेळी भाजपाचे मोठे नेते सुप्रीम कोर्टवर टीका करत होते.

याचा आज सुप्रीम कोर्टाच्या निकालावरून महाराष्ट्र सरकारला धारेवर धरणाऱ्या भाजप नेत्यांना कदाचित विसर पडलेला दिसतो. पूरक भूमिका नसेल तर एखाद्या संस्थेवर टिका करण्याचे राजकीय संस्कार आमचे नाहीत, असंही आमदार पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment