पारनेर तालुक्यातील मांडओहोळ धरण ओव्हरफ्लो,शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2020 :- टंचाईच्या काळात तालुक्यातील जनतेसाठी जीवनदायिनी ठरणारा मांडओहोळ मध्यम प्रकल्प बुधवारी पूर्ण क्षमतेने भरुन वाहू लागला.

सलग दुसऱ्या वर्षी मांडओहोळ धरण भरल्याने तालुक्याच्या उत्तर भागातील शेतकऱ्यांसह तालुकावासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मांडओहोळ प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता ३९९ दशलक्ष घनफूट तर उपयुक्त साठा ३१० दशलक्ष घनफूट आहे. यावर्षी पळसपूर, नांदुरपठार,

सावरगाव परिसरासह मांडओहोळ प्रकल्पाच्या पाणलोटक्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे धरणात आज अखेर ३९९ पैकी ३८० दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे.

……………………………………………………………………..
जाहिरात : व्यवसायाची सुवर्णसंधी – येवले अमृततुल्य या नामांकित चहाची सद्यस्थितीत तयार असलेली फ्रेंचायसी देणे ( विक्री ) साठी उपलब्ध आहे .
पत्ता :- प्रेम धन चौक महेंद्र पेढे वाला च्या समोर अहमदनगर
पहा फोटोज व लोकेशन पुढील लिंकवर https://bit.ly/3ggsEbn
फ्रेंचायसी साठी संपर्क :- आदि एन्टरप्रायजेस 9730197997, 9764855522, 9975167374
……………………………………………………………………….

सातत्याने पाऊस सुरू असल्याने ऑगस्टअखेर धरण पूर्ण क्षमतेने भरेल असा अंदाज लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी व्यक्त केला होता, तो खरा ठरला आहे. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

टंचाईच्या काळात प्रत्येक वर्षी साधारण एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत तालुक्यातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी मांडओहोळ धरणातील पाण्यावर अवलंबून रहावे लागते.

या काळात तालुक्यातील बहुतांशी गावांच्या पाणी योजनांचे उदभव कोरडे पडतात. त्यामुळे मांडओहोळ धरणातून तालुक्यातील गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणी टंचाईच्या काळात मांडओहोळ धरण तालुकावासियांसाठी जीवनदायिनी ठरते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment