कोरोना मृतदेहाची वाहतूक अन् अंत्यसंस्काराबाबत मनपाने केलेय ‘असे’ काही

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोनाचे संक्रमण वाढत चालल्याचे चित्र आहे. जवळपास १५ हजारांच्या पुढे रुग्णसंख्या गेलेली आहे. यात तुलनेने शहरामध्ये कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात आहे.

यात मृत्यू झालेल्यांचीसंख्याहीजास्त आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या मृतदेहाचे अंतिम संस्कार प्रशासनाकडूनच केले जातात. यासाठी नगरमध्ये एका ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली होती.

परंतु त्याच्या विरोधात अनेक तक्रारी असल्याने आणि त्याने एक दिवस काम बंद ठेवल्याने त्याच्याकडून हे काम काढून घेण्यात आले आहे.

अहमदनगरमधील नगरमधील ट्रस्टच्या माध्यमातून हे काम रविवारपासून सुरू करण्यात आले असल्याची माहिती महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी दिली.

रविवारपासून जिल्हा रुग्णालयातून मृतदेह वाहतूक आणि अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्याचे काम नगरमधील बोर ट्रस्टला देण्यात आले आहे.

हे काम संबंधीत शिफ्टनूसार करणार असून त्यानूसार पैसे देण्यात येणार असल्याचे आयुक्त मायकलवार यांनी सांगितले. दरम्यान,

गेल्या काही दिवसांपासून नगर शहरातील करोना बाधितांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची प्रक्रिया ठप्प झाली असून, महापालिकेने बील दिले

नसल्याचे कारण सांगून ठेकेदाराने हे काम थांबविले असल्याची चर्चा होती. तर दुसरीकडे पर्यायी व्यवस्था नसल्याने अंत्यविधीसाठी कोरोना मृतांच्या नातेवाईकांची धावपळ सुरू असल्याचे चित्र होते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment