अमरधाममध्ये मृतदेहाची विटंबना

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात नगर शहरात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. शहरातील कोरोनाचा मृत्यूदरही अधिक आहे. शहरात एकच विद्युत दाहिनी आणि चार-पाच ओट्यांची सोय आहे. 

यामुळे अमरधाममध्ये मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी वेटिंगवर राहावं लगत आहे. यामुळे अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे समोर आले आहे.

या प्रश्नावर शहरातील लोकप्रतिनिधी आक्रमक झाले आहेत. काल एकाच दिवशी विविध कारणांमुळे मृत झालेल्या २२ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जागा मिळेल तेथे सरण रचून अंत्यविधी झाला. अंत्यविधी कोणाचा झाला हे लक्षात ठेवण्यासाठी दगडावर खडूने नावे लिहून ठेवण्यात आली होती.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावर आवाज उठविला आहे. विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष परेश पुरोहित म्हणाले की, जिल्हाभरातून कोव्हिड रुग्ण नगरला आणले जातात.

त्यांचा मृत्यू झाल्यावर नियमानुसार मूळ गावी न पाठविता येथेच अंत्यसंस्कार करावे लागतात. योग्य नियोजन करायला हवे. केडगाव, भिंगार आणि अन्य ठिकाणच्या स्माशानभूमीचा वापर करता येऊ शकतो.

मुख्य म्हणजे रुग्णालयांची व्यवस्था वाढविताना मृत्यूंची संख्या वाढत असल्याचे लक्षातत आल्यावर मनपाने याचेही नियोजन करणे अपेक्षित होते. शिवसेना आक्रमक या प्रश्नावर शिवसेनाही आक्रमक झाली आहे.

करोनामुळे नगरमध्ये मृत्यूदर वाढत असल्याने अमरधाम मधील आणखी एक विद्युत दाहिनी सुरू करा, अशी मागणीच शिवसेनेने केली आहे.

अंत्यसंस्कार करण्यासाठी अमरधाम येथील ओट्यांची संख्या कमी पडत आहे. त्यामुळे दोन-दोन दिवस अंत्यविधीस वेळ लागत असून मृतदेहाची विटंबना होत आहे,

असे निवेदन शिवसेनेने महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना दिले आहे. शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी सांगितले की,

नगरच्या अमरधाम येथे एकच विद्युत दाहिनी असून आणखी एका विद्युत दाहिनीचे काम सुरू आहे. या विद्युत दाहिनीचे काम लवकर करून ती कार्यान्वित करण्यात यावी. अमरधाम येथील ओट्याची संख्या कमी पडत आहे.मृतदेहाची विटंबना होत असून नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण असल्याने आंदोलनाचा इशाराही शिवसेनेने दिला आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment