पर्यटकांना रोखा नाहीतर राजीनामा देईन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे. सरकारने काही नियमअटी व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिली आहे. पावसाळ्यात दरवर्षी भंडारदरा धरण परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. मात्र यंदा कोरोना संकटाने सर्व पर्यटन व धार्मिक स्थळांवर बंदी घातलेली आहे.

असे असले तरी शासनाचे नियम तोडून भांडारदरा धरण परिसरात गर्दी होत आहे. यामध्ये प्रशासनाने लक्ष घालावे, अशी मागणी भंडारदऱ्याचे सरपंच यांनी केली आहे. भांडारदरा धरण परिसरात गर्दी होत असल्याने स्थानिक रहिवाशांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या ठिकाणी हॉटेल व्यवसाय सुरु असून या संदर्भात प्रशासनाला वारंवार सांगूनही दखल घेतली जात नसून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. यामध्ये अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यास कोरोना कमिटीचा राजीनामा देणार असल्याचा इशारा भंडारदऱ्याचे सरपंच पांडुरंग खाडे यांनी दिला आहे.

पोलिसांकडे कर्मचारी अपुरे असून मुंबई, पुणे, नगर, नाशिक येथील वाहनांवर पोलिस, महाराष्ट्र सरकार, भारत सरकार, प्रेस, आर्मी, भारतीय उद्योग, जीवनावश्यक पुरवठा, व्हीआयपी, लोकप्रतिनिधी आदीचे स्टीकर लावून बिनधास्तपणे गाड्या भंडारदरा व घाटघर परिसरात फिरत आहेत.

काही हॉटेल उघडी असल्याने पर्यटक मद्यधुंध होऊन रस्त्यवर नाचताना दिसत असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. मोटरसायकल शेकडो तसेच रस्त्यावर गाड्यांची गर्दी तर तरुणाई धबधब्याजवळ गर्दी करत रिमिक्सच्या गाण्यावर नाचताना दिसत आहेत.

भंडारदरा येथील सरपंच पांडुरंग खाडे यांनी याबाबत पोलिस, महसूल विभाग, जिल्हा प्रशासन यांचे लक्ष्य वेधले आहे. याबाबत लेखी निवेदन पाटबंधारे विभाग, जलसंपदा विभाग, पोलिस, तहसीलदार यांना दिले आहे. जिल्हाधिकारी यांना ई- मेलद्वारे पाठविले आहे.

पर्यटक पोलिस व पुढारी, अधिकारी आपले नातेवाईक असून आपलेकुणी काही करीत नाही. या पद्धतीने वागत असून धारण परिसरातही कर्मचारी नसल्याने व सीसीटीव्ही बंद असल्याने मगरूरपणा वाढला आहे. या लोकावर व त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही असे भंडारदऱ्याचे सरपंच पांडुरंग खाडे यांनी सांगितले.

 

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment