भाजपकडून अण्णांची कोंडी: शिष्याविरोधात आंदोलनासाठी निमंत्रण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :-  2011 साली काँग्रेस सरकारच्या विरोधात अण्णा हजारे यांनी लोकपाल कायद्यासाठी मोठे आंदोलन केले होते. या भ्रष्टाचारविरोधी चळवळीत अनेक कार्यकर्ते होते. त्यातील अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत सत्ता मिळवली आहे.

एकेकाळी हजारेंचे शिष्य म्हणविल्या जाणाऱ्या केजरीवाल यांच्या विरोधात आता भाजपने जनआंदोलन उभारले आहे त्यात अण्णांना सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे. दिल्लीतील भाजपचे प्रदेशाध्यक्ष आदर्श गुप्ता यांनी हजारे यांना पत्र पाठवून केजरीवाल यांच्या विरोधात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे.

अण्णा हजारे यांनी अनेकदा टीका केली. मात्र, त्यांच्या विरोधात ठोस कृती केलेली नाही. गुप्ता यांनी पाठविलेले हे पत्र अद्याप राळेगणसिद्धी येथील कार्यालयात प्राप्त झाले नसल्याचे सांगण्यात आले. ते आल्यावरच भूमिका जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

त्यामुळे हजारे नेमकी काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. काहीही भूमिका घेतली तरी दोन्ही बाजूंनी पडसाद उमटण्याची शक्यता आहे. दिल्ली भाजपचे अध्यक्ष गुप्ता यांनी सोमवारी हजारे यांनी हे पत्र लिहिल्याचे ‘टाइम्स नाऊ’चे वृत्त आहे.

त्या पत्रात हजारे यांना दिल्लीत सध्या भाजपतर्फे सुरू असलेल्या आम आदमी पार्टी सरकारविरोधातील जनआंदोलनात सहभागी होण्याची विनंती गुप्ता यांनी केली आहे. या पत्रात गुप्ता यांनी केजरीवाल सरकारवर विविध आरोप केले आहेत. केजरीवाल सरकार हे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक भ्रष्टाचाराचे नवे नाव आहे.

या सरकारने गलिच्छ राजकारणाची परिसीमा ओलांडली आहे. स्वच्छ आणि निष्पक्ष राजकारणाच्या नावाखाली सरकारमध्ये आलेल्या आम आदमी पक्षाने राजकीय शुद्धतेचे सर्व मापदंड पायदळी तुडवले आहेत. दिल्लीतील दंगलीचे नियोजन केल्याचा आरोपही गुप्ता यांनी आम आदमी पार्टीवर केला आहे.

त्यामुळे आम्ही त्यांच्याविरुद्ध सतत लढा देत आहोत. त्यामुळेच आपण दिल्लीत येऊन भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवावा आणि आमच्या आंदोलनास पाठिंबा द्यावा. केजरीवाल सरकारने विश्वासघात केल्याचे वाटत असलेल्या तरुणांना आणि दिल्लीतील लोकांची यापासून सुटका करण्यासाठी आपण पुन्हा आंदोलन उभे केले पाहिजे,

असेही गुप्ता यांनी पत्रात म्हटले आहे. अनेक दिवस केजरीवाल यांना हजारे यांचे शिष्य संबोधून त्यांच्या सरकारच्या कारभारासंबंधी हजारे यांना भूमिका विचारली जात होती. अशा परिस्थितीत भाजपने केजरीवाल यांच्याविरोधात पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होण्याचे निमंत्रण हजारे यांना दिले असल्याचे त्यावर हजारे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

 

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment