अमरधामबाबत घेतला ‘हा’ निर्णय; महापौर म्हणतात राजकारण करू नये

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :-  शहरात कोरोना तसच इतर काही कारणांमुळे मृत्युचे प्रमाण वाढले आहे. जिल्हाभरातील मृत्यूचे प्रमाण या अलीकडील काही महिन्यात वाढल्याचे चित्र आहे.

हे जिल्हाभरातील सर्व अंत्यविधी नालेगाव अमरधाम येथे होतात. याठिकाणी अंत्यविधीसाठी एकच विद्युतदाहिनी आहे. मंगळवारपासून दुसरी विद्युत दाहिनी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे अमरधामबाबत कोणीही राजकारण करू नये, खोटी माहिती पसरवून दिशाभूल करू नये असे महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले.

नालेगाव अमरधाममध्ये कोरोनाबाधित मयत रुग्णावर अंत्यसंस्कार रिकाम्या जागेवर झालेल्या प्रकाराबाबत महापौर वाकळे यांनी तातडीने बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी आयुक्त श्रीकांत मायकलवार, शहर अभियंता सुरेश इथापे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे,

अजय चितळे, वैभव वाघ, गजेंद्र दांगट, राजू वामन, राम वाघ, अमरधामचे व्यवस्थापक स्वप्निल कुर्हे आदी उपस्थित होते. दरम्यान, नुकतेच अमरधाममधून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट नालेगाव गावठाण, सुडके मळा यांसारख्या आजूबाजूच्या बऱ्याच मोठ्या परिसरात पसरत आहे. यामुळे, आरोग्यचा प्रश्न उभा राहिला आहे.

नालेगाव अमरधाम येथे फक्त शहरातील अंत्यविधी करण्यात यावी, अन्यथा परिसरातील नागरिकांसमवेत अमरधाम येथे गेटबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नालेगाव भागातील नागरिकांनी दिला होता.तसेच काही राजकीय पक्षांनी या संदर्भात आंदोलनही केले होते.

या पार्श्वभूमीवर महापौर यांनी मंगळवारी दुसरी विद्युत दाहिनी बसविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याचे वातावरण व कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता सर्व परिसरातील नागरिकांच्या मनात भितीची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे मनपाने दुसरी विद्युत दाहिनी बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मृतांची हेळसांड होणार नाही,असे महापौर वाकळे यांनी सांगितले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment