गुड न्यूज : भंडारदरा पूर्ण क्षमतेने भरले !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- सध्या मान्सूनने अहमदनगरमधील पाणलोट क्षेत्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. मध्यंतरी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर पकडला आहे.

त्यामुळे नगर जिल्ह्यासाठी वरदान असणाऱ्या भंडारदरा धरणात काल सायंकाळी पाणीसाठा १०९७४ दलघफू (९९ .४४ टक्के) झाला होता. या धरणाची ११०३९ दशलक्ष घनफूट क्षमता असून धरण स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला भरत असते,

असा इतिहास आहे. परंतु यंदा धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस उशीरा आल्याने धरण भरण्यास उशीर झाला. पाण्याची आवक झाल्यास आज हे धरण पूर्ण क्षमतेने ११०३९ दलघफू करण्याचा पाटबंधारे विभागाचा विचार आहे.

निळवंडे धरणातही पाण्याची आवक सुरू आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत या धरणात 343 दलघफू पाणी नव्याने जमा झाले. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 7508 (90.24टक्के) झाला होता.

सायंकाळी त्यात आणखी नवीन पाण्याची भर पडली. अहमदनगर जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार बॅटिंग केल्यानंतर आता काहीशी विश्रांती घेतली आहे.

परिणामी मुळा धरणात केवळ 3222 क्युसेकने आवक होत आहे. या धरणाची २६ हजार दलघफू क्षमता आहे. या धरणात काल २३५०८ दलघफू (९० .४१ टक्के) साठा झाला होता.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment