जायकवाडी धरण ‘इतके’ भरले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- मान्सूनने महाराष्ट्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. गंगापूर, दारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची जोर ‘धार’ सुरु आहे. त्यामुळे धारणांत पाणीसाठ्यात आवक वाढली आहे.

दारणाच्याही पाणलोटातील इगतपुरी, घोटी तसेच भावली, भाम या धरणांच्या परिसरात पाऊस सुरू होता. दिवसभरातील या पावसाने धरणांमध्ये नवीन पाण्याची चांगली आवक होणार आहे.

पावसामुळे सुरु असलेल्या पाण्याच्या आवकेमुळे दारणातून 8490 क्युसेकने तर गंगापूर मधून 1040 क्युसेकने विसर्ग सुरू होता. नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून जायकवाडीच्या दिशेने 12766 क्युसेक वेगाने पाणी गोदावरीत प्रवाहित होत होते.

जायकवाडी जलाशयात काल सायंकाळी 6 वाजता या धरणात नविन पाण्याची 12916 क्युसेकने आवक होत होती. या जलाशयाचा साठा 81.40 टक्के झाला आहे.

जायकवाडी जलाशयात काल सायंकाळी उर्ध्वधरणातुन तसेच अन्य पाणलोटातून 12916 क्युसेक ने पाण्याची आवक सुरू होती.

काल सायंकाळी 6 च्या आकडेवारीनुसार जायकवाडीत 81.40 टक्के उपयुक्तसाठा झाला होता. उपयुक्तसाठा 62.4 टीएमसी इतका तर मृतसह एकूण साठा 88.4 टीएमसी इतका आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment