के. के. रेंज प्रश्नांवर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली भूमिका स्पष्ट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- के. के. रेंज प्रश्नांवर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यापूर्वी खा. सुजय विखे पाटील यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती.

या प्रश्नावर बुधवारी मंत्रालयात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी त्यांनी जमीन हस्तांतरास राज्य शासनाचा विरोध असल्याचे सांगत न्यायालयात दाद मागणे हा शेवटचा पर्याय असल्याचे सांगितले आहे.

याप्रश्‍नी तोडगा काढण्यासाठी लवकरच महसूल, वन व मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवांसोबत बैठक घेऊन ठोस निर्णय घेण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बैठकीत सांगितले.

फडणवीस सरकारच्या काळात जमीन हस्तांतरप्रश्‍नी काही निर्णय झालेला आहे किंवा नाही याची खातरजमा करण्यात येईल.

निर्णय काहीही असो या भागातील आदीवासी तसेच शेतकर्‍यांवर अन्याय होणार नाही या भुमीकेवर आपण ठाम आहोत. बागायती क्षेत्राचे हस्तांतर मनात आणणे हेच पाप आहे. या प्रकरणी शरद पवार यांचे सहकार्य घेण्यात येईल.

त्यांची भेट घेउन संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्याजवळ जमीन हस्तांतरणास ठाम विरोध दर्शविला जाईल. शासनाने लष्करास इतर ठिकाणची जमीन हस्तांतरीत करण्याचा पर्याय निवडावा असेही थोरात यांनी स्पष्ट केले.

नगरविकास, उर्जा, आदीवासी तसेच उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार नीलेश लंके यांचे प्रतिनिधी वनकुट्याचे सरपंच अ‍ॅड. राहुल झावरे, कामगार नेते दत्ता कोरडे, राजू रोडे यांच्यासह थोरात यांच्यासोबत बुधवारी मंत्रालयात के. के. रेंजप्रश्‍नी बैठक पार पडली.

यावेळी मंत्री तनपुरे, अ‍ॅड. राहुल झावरे यांनी थोरात यांच्याकडे जमीन हस्तांतर प्रकरणी सुरू असलेल्या हालचालींची माहीती दिली. या भागातील जमीनी बागायती आहेत. शेतकर्‍यांनी मोठ्या कष्टाने त्या विकसीत केल्या आहेत.

या भागात मोठया प्रमाणात धनगर समाज तसेच आदीवासी आहेत. लष्कराकडून राज्य शासनाने जमीन हस्तांतरीत करून घेतली असेल तर त्या बदल्यात लष्करास जमीन हस्तांतरीत करणे बंधनकारक असते. परंतू त्यासाठी नगर जिल्ह्यातीलच जमीन देणे बंधनकारक नाही असे मंत्री थोरात यांनी सांगितले.

 

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment