पुणे-संगमनेर-नाशिक रेल्वेसाठी भूसंपादन प्रक्रियास सुरुवात; ‘ह्या’ गावांत होणार ‘इतकी’ जमीन संपादन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :-  मागील काही दिवसांपूर्वी बहुप्रतीक्षित नाशिक, अहमदनगर, पुणे जिल्ह्याला जोडणार्‍या भारतीय रेल्वे मार्गास केंद्राने हिरवा कंदील दाखवला.

याकरिता लागणारी जमीन संपादन करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू झाली असून यासंदर्भात महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशनने अहमदनगर जिल्हाधिकारी यांना पत्र लिहिले होते.

नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी आवश्यक असलेले भूसंपादनाचे काम निधीची वाट न पाहता त्वरीत सुरू करण्याचे आदेश आता देण्यात आले आहेत. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी संबंधित उपविभागीय अधिकारी यांना दिले आहेत.

परंतु मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणेला आता कोरोना सोबतच प्रलंबित विकास कामांना गती देण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार (दि.25) रोजी बैठक घेण्यात आली.

याबाबत राव यांनी सांगितले, पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यातील सुमारे 1470 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे.

कोठे किती संपादित होणार जमीन -:

१) पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील सुमारे 575 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे.

२) अहमदनगरमध्ये बोटा, जांबुत, साकुर, अंबोरे, संगमनेर, देवठाण, चासमध्ये जमिन संपादनाची प्रक्रिया

हा होईल फायदा -:  पुणे आणि नाशिक ही दोन शहरे औद्योगिक, कृषी विकासात अव्वल आहेत. या दोन स्मार्ट सिटीला जोडण्यासाठी ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प’ उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यातील पर्यटन, शिक्षण, शेती, व्यवसाय, उद्योग क्षेत्रांच्या विकासाला गती मिळणार आहे. त्याचबरोबर या रेल्वेमुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

भूसंपादनासाठी अधिकार्‍यांची नियुक्ती पुणे -:  नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनासाठी हवेली, खेड,आंबेगाव आणि जुन्नर उपविभागीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच नगर जिल्ह्यातील संगमनेर आणि अकोले तालुक्यातील जमिन भूसंपदनासाठी अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकार्‍यांनी भूसंपादनासाठी आवश्यक जमिनीसाठी मोजणी करणे, सर्च रिपोर्ट तयार करण्याचे काम त्वरित सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

 

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment