कचऱ्यातून कोरोना संसर्ग होण्याची भीती ; एकत्र मिसळला जातो कचरा !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :-   मागील सहा महिन्यांपासून यवतमाळजिल्हा प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवसरात्र झटत आहे. स्वतः जिल्हाधिकारी प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन कामकाजाचा आढावा घेत आहे.

मात्र, अशा स्थितीत नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत या भागातील प्रतिबंधित क्षेत्र, होम आयसोलेशन, आणि होम क्वारंटाइन असलेल्या

नागरिकांच्या घरातील कचरा हा शहरातील इतर सामान्य कचऱ्या सोबत मिसळविला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

केंद्र शासनाच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज यांच्या सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डने दिलेल्या नियमावलीनुसार अश्या भागातील कचरा कशा पद्धतीने विल्हेवाट लावावा याच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

त्यानुसार जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी स्थानिक प्रशासनाला तसे आदेश दिले आहेत. मात्र, त्याची पायमल्ली होताना दिसून येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊन कोरोणाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जनतेच्या विनंतीवरून आपण होम आयशोलेशनची मुभा दिली आहे. केंद्र शासनाच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज यांच्या सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डने दिलेल्या नियमावलीनुसार कचऱ्याची विल्हेवाट लावली पाहिजे. त्यात मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी बेसिक गोष्टींचे पालन केले पाहिजे असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment