चिंताजनक बातमी : अहमदनगर जिल्ह्यात आता ‘या’ विषाणूचे संकट, पाळीव प्राण्यांचेही विलगीकरण करावे लागणार !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :-  जगभरात करोनाचे थैमान सुरु आहे. कोरोनाचा प्रार्दभाव रोखण्यासाठी बाधित रुग्णांचे विलीगीकरण करण्यात येते. माणसाप्रमाणे जनावरांचेही विलगीकरण करण्याची वेळ आली आहे. जनावरांना लंपी स्कीन डिसीज नावाच्या विषाणूने घेरले असून करोना रुग्णाप्रमाणे यांचेही विलगीकरण करावे लागत आहे.

हा विषाणू एका जनावरातून दुसर जनावरात सहज प्रवेश मिळवतो. या आजाराची साथ मराठवाड्यापाठोपाठ नगर जिल्ह्यातही पोहचली आहे. यामध्ये गाय, बैल, म्हैस, कालवड, वासरे, वळू यांच्यावर लंपी स्कीन डिसीज संसर्गजन्य विषाणूचा प्रादूर्भाव झाला आहे.

नेवासा तालुक्यातील गोधेगाव याठिकाणी या विषाणूने ग्रस्त सात जनावरे आढळली असून जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे सभापती सुनील गडाख यांनी तातडीने त्याठिकाणी पशुसंवर्धन विभगाच्या डॉक्टरांची चमू पाठवून उपचार सुरू केले आहेत. तसेच या विषाणूचा जिल्ह्यात फैलाव होऊ नये, यासाठी लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

राज्यात दीड महिन्यांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात लंपी स्कीन डिसिज या संसर्गजन्य विषाणूचा जनावर प्रादूर्भाव झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर या विषाणूचा मराठवाड्यातील बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यात फैलाव पहावयास मिळाला. या विषाणूची लागण झाल्यानंतर जनावराला ताप येऊन त्यांच्या अंगावर मोठ-मोठ्या गाठी येतात.

गाठी काही दिवसांनी फुटून त्यातून पू निघतो. या विषाणूचा एका जनावरातून दुसर्‍या जनावरांत चावणार्‍या माशा (किटक), डास आणि गोचिड यांच्यामार्फत झपाट्याने प्रसार होतो. विषाणूजन्य विकारात मृत्यूचे प्रमाण 1 ते 5 टक्के असून बाधित होण्याचे प्रमाण हे 10 ते 20 टक्के आहे.

नेवासा तालुक्यात या विषाणूचा संसर्ग जनावरांना झाल्याची माहिती सभापती गडाख यांना होताच तातडीने पशु वैद्यकीय अधिकारी यांच्यासह नगरहून जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील तुंबारे आणि त्यांच्या टीमला गोधेगाव याठिकाणी पाठविले. त्यांना या गावात सात जनावरांना या विषाणूची लागण झाल्याचे दिसले.

यावेळी डॉ. खपके, डॉ. धुमाळ, (श्रीरामपूर), डॉ. पंडुरे, डॉ. डौले (नेवासा) आणि डॉ. बाळासाहेब सोनवळे (नगर) यांचा समावेश होता. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून उपचार सुरू केले आहे. प्रार्दुभाव झालेल्या भागातील जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे.

यासह जिल्ह्यात याचा जास्त प्रार्दभाव होवू नयेत, यासाठी लवकर लस खरदीकरून जनावरांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे सभापती गडाख आणि डॉ. तंबारे यांनी सांगितले. या आजाराने मराठवाड्यातून जिल्ह्यात प्रवेश केला आहे.

यापूर्वी बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात या आजाराचा फैलाव झाला आहे. यामुळे शेतकर्‍यांनी दक्ष राहवे. या आजाराचे लसीकरण केल्यास त्यापासून शेतकर्‍यांच्या पशूधनाचे संरक्षण शक्य असल्यााचे डॉ. तुंबारे यांनी सांगितले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment