आधी तुकाराम मुंढे आणि आता ‘हे’ आयुक्त; भाजपचे ‘ह्या’ आयुक्तांशीही पटेना

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :-  नागपूर महापालिकेमधील आयुक्त तुकाराम मुंढे आणि भाजप यांच्यामधील झालेला वाद सर्वश्रुतच आहे. याची पुनर्प्रचिती आता अहमदनगर शहरात येत असल्याचे चित्र आहे. सध्या मनपात भाजपाची सत्ता आहे.

परंतु आयुक्त आमचे ऐकत नसल्याचा आरोप करत नगरसेवक तथा भाजप शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र उर्फ भय्या गंधे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

महापालिकेत भाजपची सत्ता असूनही भाजपनेच महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार आणि आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्याविरोधात पुकारलेले आंदोलन चर्चेचा विषय बनला आहे.

महपालिकेच्या रुग्णालयात मनपाची रक्तपेढी आहे. मात्र, ती बऱ्याच काळापासून बंद आहे. ती सुरू करण्यासंबंधी जी पूर्तता करणे आवश्यक आहे, त्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे पडून आहे.

महापौरांनी अनेकदा पाठपुरावा केला, तरीही आयुक्तांकडून हालचाली होत नसल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक गंधे यांनी केला आहे.

महापालिका प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे मनपाची रक्तपेढी बंद असून त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. महापौरांनी अनेकदा आदेश देऊनही याची पूर्तता होत नसल्याने आंदोलनाची वेळ आल्याचे भाजपने म्हटले आहे.

दरम्यान सत्ताधारी भाजप आणि अधिकाऱ्यांचे पटत नसल्याचे प्रकार या आधीही जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्यासोबत झाले होते.

जिल्हाधिकारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी दुजाभाव करीत असल्याचा आरोप एका आंदोलनाच्यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला होता. तसेच लॉकडाउन विषयावरून खा. डॉ. सुजय विखे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना टार्गेट केले होते.

 

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment