मोठी बातमी: महावितरणच्या ‘ह्या’ उपकेंद्राला आग

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :-  अळकुटी येथील वीज उपकेंद्रात आग लागण्याचा धक्कादायक प्रकार घडला. सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला.

शुक्रवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. ह्या उपकेंद्रावरुन बारा गावांना वीज पुरवठा करण्यात येतो. या आगीत वीज उपकेंद्रातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

वीज पुरवठा काही काळासाठी खंडित झाला आहे. अळकुटी येथील वीज केंद्राला आग लागल्यानंतर परिसरात मध्ये मोठा आवाज झाला.

त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण होते. आग लागल्यानंतर मेन ट्रान्स्फरकडे जाणारी लाईट ट्रिप झाली. यामुळे मोठे नुकसान टळले.

 

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment