आ. राधाकृष्ण विखेंचे मंदिरापुढे घंटानाद करण्याचे आवाहन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. कोरोनाचे संक्रमण रोखावे यासाठी ही उपाययोजना करण्यात आली होती. परंतु आता ही मंदिरे उघडावीत यासाठी भाजप आंदोलन करत आहे.

या आंदोलनाला पाठिंबा म्हणून कार्यकर्त्यांनी गावातील मंदिरांसमोरच घंटानाद करावा, असे आवाहन माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीच्या वतीने आज (शनिवार) राज्यात सर्व प्रमुख मंदिरापुढे सकाळी 11 वाजता ‘दार उघड उध्दवा दार उघड’ हे आंदोलन आयोजित केले आहे.

यासंदर्भात त्यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. राज्यात सर्वच व्यवसाय सुरू करण्याचे निर्णय सरकारने घेतले. मात्र मंदिरे उघण्याबाबत कोणताही निर्णय न घेतल्याने राज्यातील तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी असलेले व्यवसाय मागील पाच महिन्यांपासून बंद आहेत.

या परिसरातील अर्थचक्र अडचणीत आल्याने व्यावसायिकांना दिलासा मिळावा म्हणून राज्यातील मंदिर सुरू करण्याची मागणी अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्ती, भाविक आणि व्यावसायिकांनी सातत्याने करूनही सरकार निर्णय घेत नाही. लोकांचे ठप्प झालेले जनजीवन सुरू होत असताना

फक्त मंदिरांबाबतच सरकार एवढी आडमुठेपणाची भूमिका का घेते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आध्यात्मिक क्षेत्रातील लोकांच्या भावना सरकारच्या विरोधात अतिशय तीव्र झाल्या असल्यानेच आता थेट रस्त्यावर उतरून मंदिरांची दार उघडण्याची मागणी करावी लागत असल्याचे

आ. विखे पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आ. रोहित पवारांनी यावरून भाजपवर काल तोफ डागली. ‘भाजप राजकारणासाठी काहीही करू शकतो’ , या आंदोलनामागे काहीतरी राजकारण असावे. परंतु त्यांच्यासह धोरणामुळे जनतेला त्रास होतो अशी टीका त्यांनी केली.

अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ते बोलत होते. भाजपला महाराष्ट्राचा, राज्यातील लोकांचा कळकळा असता तर त्यांनी जीएसटीचे पैसे वेळेत राज्याला मिळावे, यासाठी एकदा तरी पाठपुरावा केला असता असेही ते म्हणाले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment