आनंदाची बातमी! जायकवाडी धरण लवकरच भरेल ; जाणून घ्या कोणती धरणे किती भरली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- मान्सूनने महाराष्ट्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. गंगापूर, दारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची जोर ‘धार’ सुरु आहे. त्यामुळे धारणांत पाणीसाठ्यात आवक वाढली आहे.

दारणाच्याही पाणलोटातील इगतपुरी, घोटी तसेच भावली, भाम या धरणांच्या परिसरात पाऊस सुरू होता. दिवसभरातील या पावसाने धरणांमध्ये नवीन पाण्याची चांगली आवक होणार आहे.

दारणातून काल सायंकाळी 6 वाजता 4354 विसर्ग सुरू होता. गंगापूर धरणातून 1560 क्युसेकने सुरू आहे. नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत 6456 क्युसेकने पाण्याचा विसर्ग होत होता.

1 जून ते काल सकाळी 6 पर्यंत गोदावरीत एकूण 18.5 टीएमसीहुन अधिक विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात काल सायंकाळी 6 च्या आकडेवारी नुसार 8600 क्युसेक ने विसर्ग दाखल होत होता.

हे धरण 87.37 टक्के भरले आहे. उपयुक्तसाठा 66.9 टीएमसी इतका झाला तर मृतसह एकूण पाणीसाठा 93 टीएमसी इतका झाला आहे. या धरणात 100 टक्के पाणीसाठा होण्यासाठी आता 9 टिएमसी पाण्याची गरज आहे.

* दारणा धरण:- तीन चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने धरणांचे विसर्ग घटविण्यात आले होते. दारणाचा विसर्ग 1650 क्युसेकवर आला होता. परवा दिवसभर पावसाने मुसळधार हजेरी लावल्याने रात्री उशीरा दारणात नवीन पाणी दाखल होऊ लागले.

7149 दलघफू क्षमतेच्या या धरणात 6705 दलघफू पाणीसाठा आहे. या धरणात 93.89 टक्के पाणीसाठा आहे. 24 तासात दारणात 217 दलघफू नवीन पाणी दाखल झाले.

* मुकणे धरण – हे 75 . 93 टक्के भरले आहे. कडवा 100 टक्के असून त्यातील विसर्ग 848 क्युसेकने सुरु आहे.

* वालदेवी धरण- 100 टक्के असून त्यातून 813 क्युसेकने विसर्ग सुरु आहे.

* गंगापूर धरण -94.21 टक्के भरलेले आहे. 5630 क्षमतेच्या या धरणात 5304 दलघफू पाणीसाठा आहे. या धरणातून परवा सायंकाळी 264 क्युसेकने विसर्ग सुरु होता. नवीन पाणी दाखल झाल्याने 1560 क्ुयसेकने या धरणातून काल विसर्ग सुरु होता.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

 

Leave a Comment