भाजपच्या तालुकाध्यक्षासह एकवीस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- कोरोना आजाराचा संसर्ग पसरु नये म्हणुन जमावबंदीचा आदेश लागु असताना धार्मिक स्थळे व मंदिर सुरु करण्यासाठी मोहटादेवी येथे घंटानाद आंदोलन करून

जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदीचा आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपच्या तालुकाध्यक्षासह एकवीस कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

शनिवारी ( दि.२९) रोजी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिका-यांनी धार्मिक स्थळे व मंदिरे भाविकांना दर्शन घेण्यासाठी खुली करावीत अशी मागणी करुन मोहटादेवी गडावर मंदिराच्या मुख्यप्रवेशद्वारावर

राज्य सरकारच्या विरोधात घंटानाद आंदोलन केले.यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, गोकुळ दौंड, सुनिल परदेशी, अशोक चोरमले, काकासाहेब शिंदे, सचिन वायकर,बाळासाहेब गोल्हार, बबन बुचकूल,आदिनाथ धायतडक,

जनार्दन वांढेकर व इतर पाच ते दहा यांनी एकत्र येवुन अंदोलन करुन जमावबंदी असतांना कोव्हिडच्या आजाराचा धोका निर्माण होईल असे कृत्य केले आहे. पोलिस कर्मचारी अतुल शेळके यांच्या फिर्यादीवरुन भाजपाच्या पदाधिका-याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment