आ. रोहित पवारांची केंद्रावर टीका; दाखवली मोदी सरकारची ‘ही’ चूक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवारांना कॅलक्युलेशन समजत नसल्याची टीका केली होती. तर भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी   आरोग्य विभागाशी संबंधित कामावरून टीका केली.

‘आरोग्य क्षेत्रातील नॉलेज नसताना राजकीय हस्तक्षेप होत असल्याने कर्जत-जामखेडमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर होत आहे,’ अशी टीका प्रा. शिंदे यांनी केली आ. रोहित पवारांवर केली. याला आपल्या पोस्टमधून आ. पवारांनी प्रतिउत्तर दिले आहे. यात त्यांनी थेट केंद्राच्या कारभारावर निशाणा साधला.

आ. रोहित पवार यांनी म्हटले आहे की, ‘आरोग्याचा वाढता खर्च भागवताना राज्याच्या तिजोरीवर प्रचंड ताण येत आहे. अशातच आज एक बातमी वाचायला मिळाली ती म्हणजे ‘आरटीपीसीआर टेस्ट किट’, पीपीई किट आणि एन-९५ मास्क याचा राज्यांना करण्यात येणारा पुरवठा थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.

हा निर्णय म्हणजे आधीच अडचणीत असलेल्या राज्यांची आणखी कोंडी करण्याचा प्रकार आहे. एकीकडे पेशंटची संख्या वाढत असताना या साधनांचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला, हे चुकीचे आहे.’ तसेच ‘सर्वच राज्ये आज संकटात आहेत. त्यामुळं केंद्र सरकारने राज्यांना त्यांचे हक्काचे जीएसटीचे पैसे देणे गरजेचे होते.

पण ते देण्याऐवजी केंद्र सरकारने कर्ज घ्यायला सांगितलं आणि आता तर कोरोना सुरक्षा साधनांचा पुरवठाही थांबवायचा निर्णय घेतला. याला जबाबदारी घेणे म्हणत नाहीत. माझी केंद्र सरकारला नम्र विनंती आहे की, त्यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे म्हटले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment