आ. संग्राम जगतापांनी घेतलंय ‘असे’ काही दत्तक; लोक म्हणतात आमदार असावा तर असा …

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर शहराचे आ.संग्राम जगताप हे तरुणांसाठी एक प्रेरक आहे. त्यांचा जनसंपर्ग आहे जनसमूह अफाट आहे. त्यांचा काम करण्याच्या अलग अंदाजामुळे ते नेहमीच प्रसिद्धीझोतात असतात.

आताही त्यांनी असे काही काम केले आहे की, लोक म्हणतायेत ‘आमदार असावा तर असा’… याबाबत अधिक माहिती अशी: जिल्हा वाहतूक शाखेने गेल्या आठ महिन्यांत दुचाकी व चारचाकी वाहनांवर कारवाई करून सुमारे दीड कोटींचा महसूल जमा केला आहे.

या निधीतून महापालिकेला सिग्नल जीर्णोद्धार निधी देण्याची मागणी जागरुक मंचाने केली. या मागणीची दखल घेत आमदार संग्राम जगताप यांनी शहरातील आठ सिग्नल दत्तक घेतले आहेत.

कायनेटिक चौक ते प्रेमदान चौक दरम्यानच्या राज्य महामार्गावरील आठ सिग्नलची देखभाल-दुरुस्ती जगताप स्वखर्चातून करणार असल्याचे जाहीर केले आहे.

तसे पत्र जागरुक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे यांना देण्यात आले आहे. त्यांच्या या कृतीमुळे ते सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment