ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांना ‘इतक्या` रुपयांचा दंड, न भरल्यास…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :-  न्यायालयाचा अवमान  केल्या प्रकरणी ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांना सर्वोच न्यायालयाने दोषी ठरवले होते. खुशाल शिक्षा द्या, पण माफी मागणार नाही, अशी भूमिका प्रशांत भूषण यांनी घेतली होती. यावरून न्यालयात पेच निर्माण झाला होता. 

सोमवारी झालेल्या सुनावणीत त्यांना एक रुपया दंड सुनावण्यात आला आहे. न्यायसंस्था आणि सरन्यायाधीश यांच्याविरुद्ध ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी दोन ट्विट केले होते. यावरून त्यांना सर्वोच्च न्यायालयाने यांना दोषी ठरविले होते.

दरम्यान, भूषण यांना आकारण्यात आलेला 1 रुपयाचा दंड त्यांनी 15 सप्टेंबर पर्यंत न भरल्यास त्यांना 3 महिन्यांचा तुरुंगवास आणि 3 वर्षे वकिलीची प्रॅक्टीस करण्यास बंदी घालण्यात येण्याची शक्यता आहे, असेही सर्वोच्च न्यायालयात सोमवारी झालेल्या सुनावणीत स्पष्ट करण्यात आले.

22 जून रोजी सरन्यायाधीश शरद बोबडे हे नागपूरच्या रविभवन येथे हेर्ले डेव्हिडसन या बाईकवर स्वार झाल्याचा फोटो व्हायरल झाला होता. त्यावर प्रशांत भूषण यांनी ट्विट केले होते. तसेच 2009मध्ये न्यायसंस्थेतील भ्रष्टाचारावर त्यांनी ट्विट केले होते.

या दोन प्रकरणात भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय खंडपीठाने भूषण यांना 14 ऑगस्टला दोषी ठरविले. 20 ऑगस्टला शिक्षेबाबत सुनावणी झाली, पण भूषण यांना पुनर्विचार करण्यासाठी चार दिवसांचा कालावधी दिला गेला.

आपण न्यायालयाचा अवमान केलेला नाही. त्यामुळे माफी मागणार नाही. या भूमिकेवर भूषण ठाम राहिले. मंगळवारी न्यायालयात सुनावणीवेळी ‘सर्वोच्च’ पेच पहायला मिळाला. न्यायमूर्ती मिश्रा, प्रशांत भूषण यांचे वकील राजीव धवन आणि केंद्र सरकारच्या वतीने अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी भूमिका मांडली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment