धक्कादायक : गायी चोरुन विकणाऱ्या टोळीत हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- गायी पळवणारी टोळी कोपरगाव शहरात कार्यरत असून ही टोळी शहरातील गायींसह गुजरातमधून आलेल्या गोरक्षकांच्या गायी पळवून त्या खाटकांना विकत असल्याची माहिती हाती आली.

धक्कादायक म्हणजे ही टोळी हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित असल्याची चर्चा आहे. १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युती सरकार सत्तेवर आल्यानंतर गोवंश हत्येवर बंदी आणण्याचा कायदा केला गेला. मात्र, त्याला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली नव्हती.

पंधरा वर्षांनंतर राज्यात परत सत्तेवर आल्यानंतर युती सरकारने तातडीने राष्ट्रपतींची मंजुरी घेऊन हा कायदा लागू केला. आता शिवसेनेचे महाआघाडी सरकार आहे. त्यांनीही या कायद्याला अद्याप हात लावलेला नसताना कोपरगावात मात्र विपरीत घडताना दिसत आहे.

युवा संघटनेशी संबंधित दुय्यम दर्जाच्या एका पदाधिकाऱ्याचा भाऊच यात गुंतला आहे. काठेवाडी गो-पाल सध्या कोपरगाव परिसरात गोवंश सांभाळतात. त्यांच्या गायी पळवण्याचा सपाटा त्याने लावला आहे. पळवलेल्या गायी वैजापूर, येवला बाजारात जाऊन त्या कत्तल करणाऱ्यांना विकल्या जातात.

नवीन औद्योगिक वसाहतीजवळ काठियावाड गुराखी आपल्या गायी सायंकाळी मुक्कामाच्या ठिकाणी घेऊन येत असताना एक जखमी असलेली व त्यामुळे मागे राहिलेली गाय टोळी टेम्पो घेऊन पळवण्यासाठी आली. नंतर हा प्रकार उघड झाला. गाय पळवणाऱ्या टोळक्याने आपण ती खरेदी केल्याचा बहाणा केला, पण तो टिकला नाही.

गोपालकाने पोलिसांकडे तक्रार दिल्यावर शहरातील एका पदाधिकाऱ्याने आमचा माणूस असे काही करणार नाही, असे सांगत युवा पदाधिकाऱ्याच्या भावास अभय दिले. गोपालकावर दबाव आणून तक्रार मागे घ्यायला लावली. खऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करावी, अशी मागणी गोरक्षक समितीने केली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment