मुळा धरणाबाबत तनपुरेंची जलसंपदा मंत्री जयंत पाटीलांकडे ‘ही’ मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यासाठी मुळा धरण वरदान आहे. लाखो लोकांची आणि हजारो हेकटर जमिनीची तहान हे धरण भागवत आलेले आहे. 1972पासून या धरणात पाणी साठा होत आलेला आहे.

जवळपास दोन टीएमसी पाणी क्षमता कमी करेल इतका गाळ त्यात आहे. हे प्रकार वाढत गेले तर भविष्यात सिंचनासाठी योग्य प्रमाणात पाणी मिळेल की नाही अशी भीतीव्यक्त करत मुळा धरणातील गाळ व गाळ मिश्रित वाळू रेतीयंत्राच्या सहाय्याने काढून मुळा धरणाची घटलेली क्षमता वाढणार असल्याच्या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करावी,

अशी मागणी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. 50 वर्षे पूर्ण झालेल्या मुळा धरणात आज अडीच ते तीन टीएमसी एवढा गाळ जमा झाल्याने त्याचा परिणाम धरणाच्या पाणीसाठ्यावर झाला आहे. धरणाची जलक्षमता कमी झाली आहे.

शासनाने मुळा धरणातील गाळ, वाळू, रेती यांत्रिकी मशिनरीच्या सहाय्याने काढून घेतल्यास त्याचा शासनास निश्चित फायदा होऊन धरणाच्या जलाशयाच्या साठ्यात तर वाढ होईलच व शासनास वाळू रेती विकून मोठा महसूल मिळण्यास मदत होईल.

तसेच गाळ शेतकर्‍यांना मोफत देऊन शेतीची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असल्याने मुळा धरणातील गाळ काढण्याची प्रक्रिया लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे. तनपुरे म्हणाले, मागील ५० वर्षांत धरणात माती, वाळू, दगड असा गाळ साचत आहे. सध्या धरणात दोन टीएमसीपेक्षा जास्त गाळ झाला असू शकतो.

एकेकाळी अग्रक्रम असलेल्या सिंचनाला आता शेवटचा प्राधान्यक्रम आहे. अकृषक पाणीवापर वाढल्याने, सिंचनासाठी धरणातून 50 टक्के पाणी मिळते. सिंचनाचे पाणी पुनर्स्थापित करण्यासाठी शासनाला आताच पावले उचलावी लागतील, असे सांगून तनपुरे म्हणाले, धरणातील गाळ काढून, दोन टीएमसी पाणी वाढल्यास,

लाभक्षेत्रातील 11 हजार हेक्‍टरचे पाणी पुनर्स्थापित होईल. गाळ काढण्याची प्रक्रिया 10 ते 15 वर्षे चालेल असेही ते म्हणाले. मेरी या संस्थेने निवड केलेल्या राज्यातील 5 धरणांमध्ये मुळा धरणाचा समावेश आहे. त्यानुसार या कामाची निविदा प्रक्रिया शासनाने यापूर्वीच राबवली होती.

परंतु नंतर याबाबत न्यायालयात याचिका दाखल झाल्याने ही निविदा प्रक्रिया शासनाने रद्द केली आहे. याबाबत न्यायालयाने स्पष्ट निकाल देऊन ही निविदा प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यास अनुमती दिली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment