अहमदनगर ब्रेकिंग : वृद्धाचा खून; दोघांना अटक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे २८ ऑगस्टला रात्री साडेदहाच्या सुमारास पुंजा भागाजी नरोटे (६०, खडांगळी, तालुका सिन्नर) यांना लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी मारहाण झाली. 

त्यांचा लोणी येथील प्रवरा रुग्णालयात ३० ऑगस्टला सायंकाळी मृत्यू झाला. कोपरगाव ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.

मृताचा मुलगा सोमनाथ पुंजाजी नरोटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, २९ ऑगस्टला सकाळी ७ च्या दरम्यान वडील कोळपेवाडीत शाळेसमोर पडले होते. त्यांचा चेहरा व डाव्या बाजूचा डोळा सुजलेला व ओठाजवळ रक्ताचा डाग दिसत होता.

त्यांनी सांगितले, मला दत्तात्रय किसन कोळपे व श्रावण कोंडाजी हलवर यांनी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलिसांनी कोळपे व हलवर यांना अटक केली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment