आनंदाची बातमी ! मुळा ‘ओव्हर’फ्लो

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- सध्या मान्सूनने अहमदनगरमधील पाणलोट क्षेत्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. मध्यंतरी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. मुळाच्या पाणलोटातील भागात पावसाने जोरदार हजेरी लावली.

त्यामुळे पाण्याची आवक सुरु असल्याने अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान असणारे मुळा धरणामध्ये पाण्याची आवक वाढली. हे धरण आज सकाळी ओव्हरफ्लो होत असून नदीत पाणी सोडण्यात येणार आहे.

या धरणाची 26हजार दलघफू क्षमता आहे. या धरणात 25444 दलघफू झाला होता.मुळा धरणात 25500 दलघफू पाणी झाल्यानंतर नदीपात्रात पाणी सोडण्याचे पाटबंधारे विभागाने नियोजन आहे.

त्यानुसार आज मंगळवारी सकाळी 9 वाजता या धरणातून 2000 क्युसेकने पाणी नदीत सोडण्यात येणार आहे. भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने येणारे पाणी निळवंडेत सोडले जात आहे.

या धरणातून काल सायंकळी 3248 क्युसेक विसर्ग प्रवरा नदीपात्रात सोडण्यात येत होता. भंडारदरात मागील 12 तासांत 140 दलघफू तर मुळा धरणात 199 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले.

दरम्यान, ऑगस्ट व सप्टेंबरच्या विकेंडचा काळ हा पर्यटकांसाठी पर्वणीच असतो. मुळा, भंडारदरा धरणाच्या भागात तोबा गर्दी होत असते.

निसर्गाच्या सानिध्यात जाण्याची आणि आनंद लुटण्याची संधी आणि आनंद पर्यटक घेत असतात. परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment