अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’ ठिकाणी बिबट्या मृतावस्थेत सापडला !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- कोपरगाव तालुक्यातील कुंभारी कोंबडवाडी शिवारातील राजेश मारुती कदम यांच्या शेती गट नंबर ९३ मध्ये दीड वर्ष वयाची बिबट्या मादी शनिवारी रात्री साडेआठ वाजता मृत अवस्थेत आढळून आली.

त्यांनी ही बाब दत्ता चिने यांना सांगितली. चिने यांनी कोपरगाव वन परिक्षेत्र अधिकारी यांना घटनेची माहिती दिली. वन अधिकारी आर. एन. सांगळे, वनकर्मचारी डी. एन. जाधव, पी.डी. दवंंगे, एल. एस. थोरात, एस. एस. गोसावी

यांनी घटनास्थळी तत्काळ भेेेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. मृत बिबट्याचे कोळपेवाडी पशुधन विकास दवाखान्यात डॉ. कोळपे यांनी शवविच्छेदन केले. बिबट्यावर कोळपेवाडी स्मशानभूमीमध्ये ग्रामस्थांच्या उपस्थितीत अग्निडाग देण्यात आला.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment