आता जाणवतोय रक्ताचा तुटवडा ! रुग्णांची मोठी पंचाईत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-   राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, जवळपास सर्वच रक्तगटाचा तुटवडा आहे.

बहुतांश रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठा उपलब्ध नसल्याने थॅलेसिमियासह इतर गंभीर आजाराच्या रुग्णांना रक्त मिळण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रक्तदानासाठी रक्तदाते तयार होत नसल्याने निगेटिव्ह रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र लॉकडाऊन असताना त्याचा थेट परिणाम रक्तसंकलनावर दिसून आला.

मे, जून आणि जुलै महिन्यात बहुतांश ठिकाणी रक्तदान शिबिरे झालीच नसल्याने रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवू लागला. त्याचा सर्वाधिक फटका थॅलेसिमियासह इतर रक्ताशी निगडित रुग्णांना बसला आहे.

या रुग्णांना नियमित रक्ताची गरज भासते; मात्र रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठा उपलब्धच नसल्याने अशा रुग्णांची मोठी पंचाईत झाली आहे. प्रामुख्याने निगेटिव्ह रक्तगटाची चणचण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.

राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, राज्यभरातील बहुतांश रक्तपेढ्यांमध्ये ए-, बी-, ओ-, एबी- या निगेटिव्ह रक्तगटाची उपलब्धता शून्य दिसून येते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment