पत्रकार पांडूरंग रायकर या कोरोना योध्‍याचे निधन हा शासकीय अनास्‍थेचाच बळी – आ.विखे पाटील

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-  आघाडी सरकारचेच आरोग्‍य ठिकाणावर नसल्‍याने सामान्‍य माणसाचे आरोग्‍य धोक्‍यात दिसते. करोना सुविधेच्‍या संदर्भात महाविकास आघाडी सरकारची फक्‍त चमकोगिरी सुरु आहे.

प्रत्‍यक्षात सामान्‍य माणसाला कोणत्‍याही आरोग्‍य सुविधा मिळत नसल्‍याने वणवण फि‍रण्‍याची वेळ आली आहे. पत्रकार पांडूरंग रायकर या कोरोना योध्‍याचे निधन हा शासकीय अनास्‍थेचाच बळी असल्‍याची संतापनक प्रतिक्रीया माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली.

मुळातच पांडुरंग रायकर यांना शासकीय यंत्रणेने उपचारांबाबत योग्‍य ते मार्गदर्शन आणि सहकार्य केले नाही. जिथे उपचारांच्‍या सुविधा नाहीत तिथे त्‍यांना पाठविलेच कोणी असा सवाल उपस्थित करुन ज्‍या हॉस्‍पीटलमध्‍ये पाठविले तिथेही पैशांसाठी त्‍यांची अडवणूक केली गेली हे खेदजनक आहे.

पुण्‍यातही त्‍यांना रुग्‍णवाहीकेची सुविधा मिळू नये ही शासन व्‍यवस्‍थेची शोकांतीका असल्‍याचे आ.विखे पाटील म्‍हणाले. करोना संकटाच्‍या काळात महाविकास आघाडी सरकारने केवळ मोठमोठ्या घोषणा केल्‍या. हॉस्‍पीटल आणि त्‍यामधील बेडबाबत फक्‍त आकडेवारी जाहीर करुन स्‍वत:ची चमकोगिरी करुन घेतली.

प्रत्‍यक्षात मात्र कोणत्‍याही आरोग्‍याच्‍या सुविधा सामान्‍य माणसाला मिळत नाहीत अशी टिका करुन आ.विखे पाटील यांनी सांगितले की महाविकास आघाडी सरकारचेच आरोग्‍य ठिकाणावर नसल्‍याने जनतेचे आरोग्‍य धोक्‍यात आले आहे. आरोग्‍य व्‍यवस्‍थेवर शासनाचा कोणताही कंट्रोल राहीलेला नाही.

शासनाची कोणती आरोग्‍य व्‍यवस्‍था नेमकी काम करते? असा प्रश्‍न उपस्थि‍त करुन शासनाच्‍या हलगर्जीपणामुळे निरापराध व निष्‍पाप लोकांचा बळी जात असल्‍याने कोवीड संकटातील बळींच्‍या संख्‍येत राज्‍याचा क्रमांक वरच्‍या स्‍थानावर आला असल्‍याकडे त्‍यांनी लक्ष वेधून पांडुरंग रायकर यांच्‍या उपचारात हलगर्जीपणा करणा-या व्‍यवस्‍थेची चौकशी करण्‍याची मागणी त्‍यांनी केली आहे.

नगर जिल्‍ह्यात पत्रकारीतेच्‍या माध्‍यमातून पांडूरंग रायकर यांनी समर्पित भावनेने स्‍वत:ला झोकून देत काम केले. विविध विषयांची मांडणी करण्‍याची हातोटी त्‍यांच्‍याकडे होती. दुर्दैवाने समाजासाठी धावणा-या पत्रकारालाच उपचार मिळू नयेत हे अतिशय दु:ख आहे. यांच्‍यासारख्‍या धावणा-या आणि विविध विषयांचा पाठपुरावा करणा-या पत्रकाराचा बळी हा शासकीय व्‍यवस्‍थेच्‍या अनास्‍थेचाच बळी असल्‍याचे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment