मंगळसूत्र चोरणारे सराईत आरोपी जेरबंद

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-  नगर शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी सोनसाखळी चोरणारे दोन सराईत आरोपी श्रीरामपूर पोलिसांनी जेरबंद केले आहेत. पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने नांदूर(ता.राहाता)

शिवारात सापळा रचून व पाठलाग करीत सचिन लक्ष्मण ताके (सध्या रा. सावळेवस्ती,नांदुर ता. राहाता) व बबन चंद्रभान रशिनकर या दोघांना ताब्यात घेतले.

राशिनकर यांच्याकडे चौकशी केली असता त्याने नेवासा रोडवरील रेल्वे नागपुलाजवळ एका महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र बळजबरीने हिसकावून चोरुन नेल्याची कबुली दिली.

तसेच आरोपी ताके याचेसोबत श्रीरामपुर शहरातील गणपती मंदिर परिसरात एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण मोटारसायकलवरुन बळजबरीने चोरुन नेलेले असल्याची कबुली दिली.

त्याच्याकडून ६ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. दोन्ही आरोपींवर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ.दिपाली काळे, पोलिस उपअधीक्षक राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोस्टेचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांचेसह पोसई संतोष बहाकर,

पोसई अतुल बोरसे, तपास पथकाचे पोहे के लोटे, पोको अर्जुन पोरडे, सुनिल विधे, ‘ पंकज गोसावी, महेंद्र पवार, गणेश गावडे, किशोर गाथा, संतोष दरेकर, अर्चना बडे यांनी केली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment