स्टेशन रोडवरील बेकायदेशीर अतिक्रमण हटावा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-  नगर शहरातील रेल्वे स्टेशनला स्वच्छतेच्या बाबतीत देशात तिसरा क्रमांक मिळालेला आहे. मात्र याचा रेल्वे स्टेशन कडे जाणारा रस्ता आता अतिक्रमित होत आहे.

रेल्वे स्टेशन कडे जाणऱ्या मल्हार चौक ते शिवनेरी चौक या मार्गालगत सातत्याने नव्याने अतिक्रमणे व झोपड्या वाढत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूस टपऱ्या व दुकाने थाटले जात आहेत.

आयकॉन पब्लिक स्कूल लगतची जागा प्राथमिक शाळा व क्रीडांगणासाठी प्रत्यक्षात आरक्षित आहे. तसेच त्यापुढील जागा ही भाजी मार्केट, व्यापारी संकुल व पार्किंग म्हणून आरक्षित ठेवण्यात आलेली आहे.

ही सर्व वस्तुस्थिती लक्षात घेऊन सध्या या महानगरपालिकेच्या रोडवर ही सर्व आरक्षण झुगारून बेकायदेशीररित्या झोपड्या व टपऱ्या उभारण्यात येत आहे.

मोठ्याप्रमाणात याभागात लोकवस्ती विकसित झालेली असल्यामुळे त्यांच्या सोयीसाठी भविष्याचा विचार करून या जागेवर हे आरक्षण ठेवण्यात आलेले आहे.

मात्र काही महिन्यापूर्वी मोकळा असलेल्या रस्त्यावर आता अतिक्रमणे वाढत असल्याने रेल्वे स्टेशनला ये जा करणाऱ्या नागरिकांना व वाहनांना अडथळे निर्माण होत आहे.

महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच हे अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे बेकायदेशीरपणे केलेल्या या अतिक्रमणावर मनपा अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करावी, अन्यथा परिसरातील नागरिक तीव्र आंदोलन करतील,

असा इशारा स्टेशनरोड भागातील विविध वसाहतीमधील सर्वसामान्य नागरिकांनी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment