ठेकेदारावर कारवाई करा; काँग्रेसची मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :- नेवासे तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आलेल्या रस्ता कामातील अनियमितता व गैरव्यहवारासंदर्भात संबंधितांवर कारवाई करावी या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या नगर येथील कार्यालयासमोर नेवासे काँग्रेस तालुकाध्यक्ष संभाजी माळवदे, प्रवीण तिरोडकर यांच्या

नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी नेवासे तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून झालेल्या नेवासे (संत ज्ञानेश्वर मंदिर) ते शनिशिंगणापूर या दोन देवस्थानांना जोडणारा रस्ता.

तसेच वडाळे बहिरोबा ते म्हाळसपिंपळगाव- कौठा रस्ता. या दोन रस्त्यांच्या कामांची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हावी, यासाठी उपोषण करण्यात आले.

या दोन्ही रस्त्यांच्या ठेकेदारांनी मंजूर अंदाजपत्रक, प्लॅन- इस्टिमेटप्रमाणे या रस्त्यांचे काम न करता मनमानीपणाने उरकल्याने अत्यंत निकृष्ठ दर्जाचे झाल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला आहे.

दरम्यान राज्य गुणवत्ता निरीक्षकांकडून तपासणी अहवाल प्राप्त झाल्यावर दोषी आढळणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या कार्यकारी आधिकार्‍याने दिल्यानंतर नेवासे काँग्रेस कमिटीने

धरणे व उपोषण स्थगित केले. नेवासे तालुक्यातील रस्त्यांचे वाटोळे करणाऱ्या ठेकेदारांवर अशा प्रकारे गुन्हा दाखल करून त्याची अंमलबजावणी सुरू करावी. (संभाजी माळवदे,काँग्रेस तालुकाध्यक्ष )

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment