अहमदनगर जिल्ह्यात ‘या’ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य व बाजार समितीचे संचालक एकमेकांना भिडले ! आणि….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर  ग्रामपंचायतीमध्ये आज परंपरागत विरोधक असणारे जिल्हा परिषदेचे सदस्य शरद नवले आणि बाजार समितीचे संचालक सुधीर नवले या दोघांमध्ये जोरदार भांडणे झाली. 

ग्रामपंचायतीत झालेल्या वादाचे पडसाद नंतर बाहेर उमटत दोघांच्याही नातेवाईकांमध्ये मारामारीचा प्रकार घडला. स्थानिक पोलीस वेळीच पोहल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे गावकरी सांगतात. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, आज सकाळी ग्रामपंचायतीत सुधीर नवले बसलेले होते त्याचवेळी शरद नवले त्या ठिकाणी आले.

सुधीर नवले यांच्याबरोबर ठेकेदारही बसलेले होते. यावेळी सुधीर नवले व शरद नवले यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरु झाला. त्यानंतर शरद नवले श्रीरामपूरचे दिशेने गेले. सदर प्रकार समजताच सुधीर नवले यांचे काही समर्थक शरद नवले यांच्या बंधूच्या दुकानाजवळ गेले. त्याठिकाणी शरद नवले यांचेही का

ही समर्थक भावबंद जमले. याठिकाणी मारामाऱ्या सुरू झाल्या. सदर प्रकार कळताच एकच धावपळ झाली. घटनेची माहिती समजताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचल्याने मारामाऱ्या करणारे पांगले.

पोलीस तातडीने आल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. यानंतर सुधीर नवले यांचे समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी जमले होते. दोघांनी आपल्या नातेवाईकांना मारहाण झाल्याचा आरोप केला आहे.

पोलीस स्टेशनच्या बाहेरही एकमेकांना चोपले दरम्यान दोन्ही गटाचे लोक दुपारी फिर्याद देण्यासाठी बेलापूर पोलीस ठाण्यासमोर जमले असता या ठिकाणी पुन्हा दोन्ही गटात तुफान हाणामाऱ्या झाल्या. तर पोलीस या मारामाऱ्या सोडवत होते.

‘मी कामानिमित्त सकाळी ग्रामपंचायतीत गेलो होतो त्यावेळी सुधीर नवले हे खासगी ठेकेदारासह तेथे बसून चेक लिहीत होते. आपण आक्षेप घेतला, चेक लिहीण्याचा त्यांना अधिकार नाही. क्लार्क गुरू यांना आपण तसे सांगून श्रीरामपूरला निघून आलो. त्यानंतर सुधीर नवले यांच्या समर्थकांनी आपल्या बंधूंच्या दुकानावर जाऊन मारहाण करण्याचा प्रकार केला.’ – शरद नवले, जिल्हापरिषद सदस्य 

‘मी सकाळी ग्रामपंचायतीत बसलो होतो. रहिवाशी दाखल्याचा अर्ज लिहीत असतांना शरद नवले त्याठिकाणी आले. त्यांनी तू इथे कसा बसला? तुझ्या बापाची ग्रामपंचायत आहे का? असे म्हणत शिवीगाळ सुरू केली. दादागिरीची भाषा करत त्यांनी त्यांच्या पुतण्याला फोन करून बोलावून घेतले व माझा चुलत भाऊ समीर यास मारहाण केली’ – सुधीर नवले, संचालक बाजार समिती

इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment