बिबट्याने फस्त केली शेळी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील आंग्रेवाडी येथे बुधवारी बिबट्याने मेंढपाळ शिवाजी शिदा शिंदे यांची शेळी शेजारी असलेल्या उसाच्या शेतात ओढत नेऊन फस्त केली.

बिबट्याने शेळी फस्त करून शेजारी सखाहरी बबन काकडे यांच्या खुरुड्यातील कोंबडीवर ताव मारला. दोन दिवसांपूर्वी राजू रभाजी आग्रे यांची शेळी खाल्ली होती.

अशा प्रकारे या बिबट्याच्या हल्ल्याचे प्रमाण वाढत आहे. बिबट्याच्या उपद्रवी घटना वाढत अाहेत. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

वनविभागाने या क्षेत्रात पिंचरा लावावा, अशी मागणी करण्यात येत आहे. बिबट्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा, अशी मागणी केली जात आहे.

या घटनेची माहिती वनरक्षक एन. डी. कोळी, वन कर्मचारी सुनील अमाेलिक, बाळासाहेब सिनारे यांना देण्यात आली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment