ऊसतोडणी कामगार, मुकादम व वाहतुक यांच्या दरवाढीसाठी पंकजाताई घेणार मोठा निर्णय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- यावर्षीचा खरीप हंगाम चांगला साधला आहे. राज्यात सर्वदूर मुबलक प्रमाणात पाऊस झाला आहे. यामुळे ऊसतोडणीसाठी जाणाऱ्या मजुरांची संख्या घटण्याची शक्यता आहे. करोनामुळे मजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

या परिस्थितीत ऊसतोड मजूर संघटना संप करण्याच्या विचारात आहे.आगामी ऊसगाळप हंगामावर आतापासूनच संकटाचे ढग जमू लागले आहेत. यामुळे ऊस उत्पादक व साखर कारखानदारासाठी यंदाचा गाळप हंगाम कसोटीचा ठरणार आहे. आगामी गळीत हंगामापासून ऊसतोडणी कामगार,

मुकादम व वाहतुकदारांच्या दरवाढीसाठी माजी मंत्री पंकजा मुंडे लवकरच संपाची घोषणा करणार असून त्यासाठी संघटनेच्या पदाधिकार्‍यांकडून राज्यभर मुकादम व ऊसतोडणी मजुरांच्या बैठका सुरू झाल्याची माहिती लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी कामगार, मुकादम व वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष, माजी आमदार केशव आंधळे यांनी दिली.

पाथर्डी तालुक्यातील ऊसतोडणी कामगार प्रतिनिधी व मुकादम यांची संयुक्त बैठक पाथर्डी येथील शासकीय विश्रामगृहावर संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार मोनिका राजळे होत्या. तर भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, उपाध्यक्ष संजय किर्तने, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय बडे,

ऊसतोडणी कामगार संघटनेचे पाथर्डी तालुकाध्यक्ष पिराजी किर्तने, सचिव अशोक खरमाटे, वामन किर्तने, सुखदेव सानप, सुरेश वनवे, सर्जेराव डोईफोडे, तुकाराम तिडके, बाबासाहेब डोईफोडे, राजरत्न जायभाये, संतराम दराडे, महादेव किर्तने, शिवाजी बांगर, बाळासाहेब बटुळे, अजिनाथ कराड, माणिक बटुळे आदी यावेळी उपस्थित होते.

माहिती देताना आंधळे म्हणाले, राज्यात ऊसतोडणी कामगार क्षेत्रात 12 संघटना व सुमारे पंधरा लाख ऊसतोडणी मजूर कार्यरत आहेत. सर्वात मोठी व प्रभावशाली संघटना म्हणून पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी कामगार व मुकादम व वाहतूकदार संघटना म्हणून ओळखली जाते.

पंकजाताई मुंडे यांनी ऊसतोडणी मजुरांना केंद्रस्थानी मानून नेहमीच न्याय दिला आहे. ऊसतोडणी मजूर मोठ्या संख्येने पंकजाताईंबरोबर असल्याने साखर संघ व कारखानदारांचे त्यांच्या भुमिकेकडे लक्ष आहे. साखर संघ व संघटनेदरम्यान दरवाढीच्या कराराची मुदत यावर्षी संपल्याने तोडणीसाठी प्रतिटन पाचशे रुपये व मुकादमाच्या कमिशनमध्ये दरवाढ या प्रमुख मुद्यांवर संप पुकारला जाणार आहे.

2015 मध्ये संप करून पंकजाताई मुंडे यांनी 20 टक्के वाढ मिळवून दिली होती. संप करण्याच्या पूर्वी त्या ऊसतोडणी मजूर, मुकादम यांच्याशी चर्चा करून विश्वासात घेऊनच संपाची घोषणा करतात. त्यामुळेच ऊसतोडणी मजूर असणार्‍या तालुक्यात बैठका घेऊन अडचणी व दरवाढीबाबत चर्चा करून पंकजाताईंसमोर भूमिका मांडणार आहोत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment