एसटी बसच्या दोन सीटमध्ये राहणार पडदा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- कोरोनाच्या संकटामुळे एसटी बसच्या दोन सीट मध्ये पडदा लावण्यात येणार आहे. कोरोना पासून प्रवाशांचा बचाव करण्यासाठी आणि महसूल वाढविण्यासाठी ही कसरत करण्यात येत आहे.

या कारणामुळे घेतला निर्णय कोरोनामुळे एसटीची चाके ठप्प झाली होती. काही दिवसांपूर्वीच मोजक्या मार्गावर बसेस सुरू झाल्या आहेत. परंतु फिजीकल डिस्टसिंग ठेवण्यासाठी ४४ सीटर बसेसमध्ये केवळ २२ प्रवाशांना बसविण्यात येत आहे.

पूर्ण क्षमतेने प्रवासी बसविण्यासाठी पडद्यांचा आधार घेण्यात येत आहे. एसटीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रायोगिक तत्वावर पुण्यात काही बसेस मध्ये पडदा लावण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नागपूर विभागात २५ ते ३० टक्के बसेस सुरू आहेत. एसटीचे आर्थिक चाक रुतलेले अद्याप लांब पल्ल्याच्या बसेस सुरू करण्यात आलेल्या नाहीत.

यामुळे एसटीचे किती नुकसान होत असेल याचा अंदाज येतो. बस मध्ये ४४ प्रवासी चढल्यानंतर एसटी’ला फायदा होणार आहे.

परंतु दिलेल्या निर्देशानुसार २२ प्रवाशांनाच बस मध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे. बसच्या दोन सीट मध्ये पडदा लावण्याचा विचार सुरू आहे. या बाबत परिपत्रक मिळाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment