मुळा धरणाबाबत इतिहासात पहिल्यांदाच घडलं असावं ‘असं’ काही; परिसरात केलाय….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-  मुळा धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे याभागात आता पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. मात्र, यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असल्यामुळे प्रशासनाने या भागात कलम १४४ लागू करीत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

हे आदेश ३० सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहेत. त्यामुळे आता मुळा पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी यांना वगळता इतरांना याभागात जाण्यास निर्बंध असणार आहेत.

अशी घटना मुळा धरणाबाबत इतिहासात पहिल्यांदाच घडली असावी. मुळा धरण यंदा पूर्ण क्षमतेने भरले आहे. यामुळे धरणातून मुळा नदीपात्रात पाणी सोडले आहे. दरम्यान धरण परिसरात पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे.

यामुळे प्रशासनाने ३० सप्टेंबरपर्यंत पर्यटकांना येथे गर्दी करण्यासाठी मनाई केली आहे. तसे आदेशही प्रशासनाने काढले आहेत. २६ हजार दशलक्ष घनफूट क्षमता असलेले हे धरण सर्वात मोेठे धरण आहे.

हे धरण भरल्याने पाटबंधारे धरणाचे सर्व ११ दरवाजे उघडले आहे. यामुळे मुळा नदीला पूर आला आहे. दरम्यान येथे पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. काही दुर्घटना घडू नये, यासाठी पोलीस, पाटबंधारे विभाग दक्षता घेत आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment