कोपरगाव तालुक्यात ४७ जण बाधित

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- रविवारी नगर येथे स्वॅब तपासणी करिता पाठवलेल्या नमुन्यापैकी ११ जण बाधित, खासगी लॅबमधील तपासणीत १ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. तब्बल १११ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या.

त्यापैकी कोपरगाव शहर व ग्रामीण असे ३५ रुग्ण बाधित आढळून आले. ७६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. कोपरगाव शहर धारणगाव रोड १, महादेव नगर ६, येवला रोड १, शारदानगर १, बिरोबा चौक १,

विवेकानंदनगर १, साईनगर १, शिंगीनगर १, कोर्ट रोड १, लक्ष्मीनगर २, साईसिटी २, गजानननगर ८ असे २६ रुग्ण कोपरगावात आढळले. ग्रामीण जेऊर कुंभारी १, कोकमठाण १,

संवत्सर १, चासनळी ५ असे ९ रुग्ण पॉझटिव्ह आढळले. शहर व ग्रामीण मिळून एकूण ३५ व खासगी लॅबमधील १ व नगर येथील अहवालामधील १२ जण बाधित असे एकूण ४७ बाधित रुग्ण आढळून आले,

अशी माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली. आजपर्यंत १०५१ कोरोना बाधितांची संख्या असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८७६ आहे. रुग्ण आढळून आले,

अशी माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली. आजपर्यंत १०५१ कोरोना बाधितांची संख्या असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८७६ आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment