कोरोनाची वारी तहसीलच्या दारी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- नगर जिल्ह्यासह कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यातील गावपातळीवर पोहचला असून याचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने शेवगाव तहसील कार्यालयातील काम बंद करण्याची वेळ आली आहे.

शेवगाव तहसील कार्यालयातील दोन कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने तहसील कार्यालयातील सर्व कामकाज बंद ठेवण्यात आले आहे.

तालुक्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गेली सहा महिने अग्रेसर असलेल्या महसुल विभागातच कोरोनाने शिरकाव केल्याने संसर्गाचा धोका वाढतच चालला असल्याने नागरीकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.

शहर व तालुका अनलाँक केल्यानंतर रुग्ण संख्या सातत्याने वाढत चालल्याने त्यावर अंकुश ठेवण्यात प्रशासनाच्या नाकीनऊ आले आहेत. दरम्यान तालुक्यातील कोरोना बाधीतांचा आकडा ८०० च्या जवळपास पोहचला आहे.

तालुक्यातील ५८ गावात कोरोनाने शिरकाव केला असून आतापर्यंत नऊ रुग्णांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. सद्य स्थितीत त्रिमुर्ती विदयालय, एकनाथ आयुर्वेद रुग्णालय, साई कोवीड सेंटर व नगर येथे २१६ रुग्ण उपचार घेत असून

५६० जणांनी कोरोनावर मात केली आहे. तहसील कार्यालयाबरोबरच येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत असलेले दुय्यम निबंधक कार्यालय,

तालुका कृषी विभाग, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, आधार दुरुस्ती केंद्र, तलाठी कार्यालय आदी कार्यलय बंद ठेवण्यात आले

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment