या तालुक्यात आढळले २४ कोरोना पॉझिटिव्ह

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात आज शहर व ग्रामीण मिळून एकूण २४ रुग्ण बाधित आढळले आहे.

अहमदनगर येथे काल शासकीय रुग्णालयात ९ तर खाजगी प्रयोगशाळेत १५ संशियित रुग्णांचे अहवाल पाठविण्यात आले होते. हे सर्वचे सर्व अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

तर आज परत नगर येथे 16 रुग्णांचे स्वैबचे नमुने तपासणी करीत पाठविले आहे. तालुक्यातील 24 पॉझिटिव्ह रुग्णांची आकडेवारी गजानन नगर -२,साईसिटी – १,श्रद्धा नगर – १, गारदा नाला – २,

साई नगर – १,जोशी नगर – १, धरणगाव रोड – १,जिजामाता उद्यान – १, कर्मवीर नगर – ३, दत्त नगर – १, संवत्सर -२,कारंजी – १, कोकंमठाण -२, वेस – १,

तिनचारी – १, कान्हेगाव – १, सोनेवाडी – १, मढी – १ असे शहर व ग्रामीण मिळून एकूण २४ बाधित रुग्ण आढळून आले आहे.

अशी माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.तर आज ४७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment