मुळा धरणातून तब्बल ‘इतक्या’ पाण्याचा विसर्ग

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :-  नगर व पारनेर भागातून पाण्याची आवक वाढल्याने मुळा धरणाच्या ११ मोऱ्यांतून नदीपात्रात सुरू असलेल्या विसर्गात मंगळवारी दुपारी वाढ करण्यात आली.

धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्यानंतर १ सप्टेंबरपासून धरणातून मुळा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. १ ते ८ सप्टेंबरपर्यंत धरणातून १२०० दशलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग झाला आहे.

मंगळवारी सकाळी ३ हजार क्युसेक सुरू असलेला विसर्ग दुपारी १ वाजता ४ हजार क्युसेक करण्यात आला. धरणाच्या उजवा कालव्यातून ५५० क्युसेक, तर डाव्या कालव्यातून १५० क्युसेक विसर्ग सुरू आहे.

उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रासाठी ५२५ दशलक्ष घनफूट, तर डावा कालव्यातून मुसळवाडीसाठी ७५ दशलक्ष घनफूट पाणी आजपर्यंत सोडण्यात आले आहे.

मंगळवारी सायंकाळी धरणातील साठा २५ हजार ४४४ दशलक्ष घनफूट ठेवून कोतूळ, तसेच नगर व पारनेर या भागात झालेल्या पावसाच्या पाण्याचा मुळा नदीपात्रात, तसेच उजवा व डावा कालव्याच्या लाभक्षेत्रासाठी विसर्ग सुरू आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment