मोठी बातमी: भारतातील मानवी चाचण्या थांबवल्या!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आशेचा किरण म्हणून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीकडे पाहिलं जात होतं. मात्र अ‍ॅस्ट्राझेन्का आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनं आपल्या लसीची मानवी चाचणी सध्या थांबवली आहे.

ऑक्सफर्डने विकसित केलेल्या लसीचा डोस दिल्यानंतर ब्रिटनमध्ये एक व्यक्ती आजारी पडला. त्यामुळे अ‍ॅस्ट्राझेन्काने दुष्परिणामांची शक्यता लक्षात घेऊन ऑक्सफर्ड लसीची चाचणी तूर्त थांबविली आहे.

अ‍ॅस्ट्राझेन्काच्या मते ही स्थगिती ‘रुटिन’ आहे. पण चाचणीत सहभागी व्यक्तीच्या आजारपणाबद्दल अजून काहीही कळले नसल्यामुळे स्थगिती द्यावी लागली आहे.

दरम्यान भारतात सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाकडून ऑक्सफर्डच्या या लशीच्या चाचण्या सुरु होत्या. कारण भारतात सिरम इन्स्टिट्युटकडे या लशीचे उत्पादनाचे अधिकार आहेत.

या प्रकरणी भारताचे औषध महानियंत्रक डॉ. व्ही. जी. सोमानी यांनी ‘सीरम इन्स्टिटय़ूट’ला नोटीस बजावली होती. अ‍ॅस्ट्राझेन्का कंपनीने लशीच्या चाचण्या थांबविल्याची माहिती सीरमने दिलेली नाही.

त्यामुळे लशीची सुरक्षितता निश्चित होईपर्यंत चाचणीसाठी दिलेली परवानगी रद्द का करू नये, अशी विचारणा या नोटिसीद्वारे करण्यात आली होती.

दरम्यान ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून मिळालेल्या या नोटीसीनंतर सिरमनेही भारतात क्लिनिकल चाचण्या थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

डीसीजीआयकडून पुढील सूचना मिळेपर्यंत भारतात ऑक्सफर्डच्या लशीच्या मानवी चाचण्या थांबवण्यात येत आहेत असे सिरमने म्हटले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment