ग्रामीण रुग्णालयास ‘हे’ द्या; जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :-  मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला.

त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. हा अतिरिक्त तणाव वैद्यकीय सेवेवर येत असलेला पाहता,

श्रीरामपूर तालुक्यास अ‍ॅम्बुलन्स, आवश्यक ती औषधे व साधने ग्रामीण रुग्णालयास पुरविण्यासाठी उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी तात्काळ संबंधित कार्यान्वयीन यंत्रणेला आदेश दिले आहेत.

यासाठी आ. लहू कानडे यांनी श्रीरामपूर येथे ग्रामीण रुग्णालयात 50 बेडसाठी ऑक्सीजन लाईन टाकण्यासाठी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून तात्काळ अनुदान मंजूर करवून दिले आहे.

आ. कानडे यांनी दि. 3 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीनंतर श्रीरामपूर आरोग्य केंद्रातील 50 बेडचे ऑक्सिजन लाईनचे, व्हेंटिलेटरचे प्रगतीत असणारे काम लवकरात लवकर पूर्ण करणे तसेच अ‍ॅम्ब्युलन्स पुरवठा,

आवश्यक मुबलक औषधे व उपचाराचे साहित्य श्रीरामपुरातच उपलब्ध करवून देणेबाबत जिल्हाधिकारी यांना कळविले होते.

त्यानुसार त्यांनी जिल्हा शल्यचिकीत्सक यांना सदरची पूर्तता तात्काळ करण्यासाठी 9 सप्टेंबर रोजी पत्र देऊन संबंधित कार्यान्वयीन यंत्रणेला आदेशीत केले आहे.

दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना प्रत्यक्ष भेटून अधिवेशनादरम्यान ग्रामीण रुग्णालय श्रीरामपूरसाठी आवश्यक ते मनुष्यबळ तात्काळ उपलब्ध करून देण्याचीही मागणी आ. कानडे यांनी केली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment