बाबत जिल्ह्यातील हे आमदार काय म्हणाले पहा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यासह गावपातळीवर कोरोनाचे संक्रमण वाढत चालले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये लॉकडाऊनबाबत विचार सुरु आहे.

तर काही ठिकाणी याला विरोध होत आहे. यामध्येच आमदार लहू कानडे यांनी आपले मत व्यक्त केलं आहे. शहरात स्वत:च्या सुरक्षेसाठी कोणी स्वयंस्फूर्तीने व्यवसाय बंद ठेवत असेल तर त्याचे स्वागत आहे.

मात्र उपासमारीची वेळ आलेल्या सामान्य माणसांना बंदमध्ये बळजबरीने सहभागी करून घेऊ नये. त्यांना व्यवसाय करण्याचा अधिकाार आहे, असे काँग्रेस पक्षाचे आमदार लहू कानडे यांनी स्पष्ट केले.

येत्या रविवारपासून शहरात आठ दिवसांची जनता संचारबंदी लागू करण्याचा निर्णय झाला आहे. त्याकरिता शुक्रवारी रिक्षाद्वारे व्यावसायीकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे यांनी मात्र याधीच बंदला उघडपणे विरोध केला आहे. लॉकडाऊनचा फटका अर्थव्यवस्थेला बसला आहे.

त्यामुळे लॉकडाऊन बंद करून सर्व व्यवहार सुरू केले जात आहेत. नगरपालिकेने स्वच्छतेचे काम चोखपणे पार पाडावे. घराबाहेर पडताना मास्क वापरण्याची खबरदारी घ्यावी, नियमिपणे हात स्वच्छ धुवावेत, असे आवाहन कानडे यांनी केले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment