मराठा आरक्षणाबाबत आमदार रोहित पवार म्हणाले…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :- गेल्या काही महिन्यापासून मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. नुकतेच सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळं आता आरोप – प्रत्यारोप सुरु झाले आहे.

आरक्षणाच्या मुद्यावरून छत्रपती उदयनराजे भोसले यांनी देखील सरकारला इशारा दिला आहे. तसेच विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली असताना सत्ताधारी पक्षाकडून सरकारची बाजू हिरीरीनं मांडली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी याबद्दल बोलताना महाविकास आघाडी सरकार व न्यायालयावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. रोहित पवार म्हणाले.

‘मराठा आरक्षण व केंद्र सरकारने खुल्या वर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी दिलेलं १०% आरक्षण ही दोन्ही प्रकरणं सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठाकडं सोपवली.

मात्र, तसं करताना फक्त मराठा आरक्षणालाच स्थगिती दिली, हे धक्कादायक आहे,’ असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. ‘सरकार पूर्ण प्रयत्न करत असल्याचं मी पाहतोय.

आरक्षण कायमस्वरूपी टिकवण्यासाठी घटनापीठाकडं पाठवण्याची मागणीही आपणच केली होती. लाखो युवांच्या भावनेचा व भविष्याचा हा प्रश्न असून अंतिम निकाल हा आरक्षणाच्याच बाजूने लागेल, असा विश्वासही रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment