हे आहेत आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :-  जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कारार्थींच्या यादी आज जाहीर करण्यात आली आहे.

या यादीला विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नुकतीच मान्यता दिली आहे. दरवर्षीच शिक्षकदिनी या पुरस्कारांचे वितरण केले जाते. मात्र, यंदाच्या वर्षी कोरोना असल्यामुळे पुरस्कारांचे वितरण झालेले नाही.

या पुरस्कारांचे लवकरच वितरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे जिल्ह्यातील आदर्श शिक्षक पुरस्कारार्थी : स्मिता धनवटे (कळस बुद्रुक, ता. अकोले),

सुशीला धुमाळ (मिर्झापूर, ता. कोपरगाव), नवनाथ सूर्यवंशी (हरिसन ब्रॅंच, ता. राहाता), वैशाली सोनवणे (ममदापूर, ता. श्रीरामपूर), शोभा शेंडगे (फत्याबाद, ता. राहुरी), दत्तात्रय नरवडे (वांबोरी स्टेशन, ता. राहुरी), रेवणनाथ पवार (ता. नेवासे),

जयराम देवढे (चेडे चांदगाव, ता. शेवगाव). बेग आरीफ युसूफ (निंबादैत्य, ता. पाथर्डी), मुकुंदराज सातपुते (रा. वाकी ता. जामखेड), विजकुमार राऊत (नागलवाडी, ता. कर्जत), शोभा कोकाटे (गोपाळवाडी, ता. श्रीगोंदे), मीनल शेळके (बगेवाडी,

ता. पारनेर), जयश्री घोलप (शिंदेवाडी, ता. नगर). प्रमिला बोर्डे (भातकुडगाव, ता. शेवगाव), उत्तम शेलार (बेलापूर, श्रीरामपूर) या दोन केंद्र प्रमुखांनाही पुरस्कार जाहीर झालेला आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment