पावसाने झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई द्या : कोल्हे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,13 सप्टेंबर 2020 :-  कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील पोहेगाव आणि परिसरातील गावांमध्ये झालेल्या नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार स्नहेलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री, कृषिमंत्री, महसूलमंत्री आणि पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली.

मतदारसंघातील पोहेगाव, अंजनापूर, बहादरपूर, धोंडेवाडी, जवळके, बहादराबाद, शहापूर, सोनेवाडी, चांदेकसारे, घारी आदी गावामध्ये १० सप्टेंबर रोजी वादळी वाऱ्याचा व मुसळधार पावसाचा तडाखा बसला.

त्यामुळे या गावातील शेतातील उभी पिके ऊस, मका, कपाशी, कांदा रोपे, बाजरी, सोयाबीन या पिकांचे नुकसान झाले. अनेक घरांमध्ये पाणी शिरले, विद्युत पोलच्या तारा तुटून मोठे नुकसान झाले.

यापूर्वीही या भागावर नैसर्गिक आपत्ती येऊन नुकसान झाले होते. या संकटातून सावरत असतानाच पुन्हा या भागातील शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती कोसळली.

यासाठी शेतकऱ्यांना भरपाईची आवश्यकता आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी कोल्हे यांनी केली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment