जिल्ह्यातील या तालुक्यात सोमवारपासून लॉकडाऊन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,13 सप्टेंबर 2020 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. कोरोनाची साखळी मोडण्यात अयशस्वी होत असल्याने अनेक तालुक्यांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाउन करण्याची मागणी केली जात आहे.

यामध्येच श्रीगोंदा तालुक्‍यात आठवडाभर “जनता कर्फ्यू’ लागू करण्याबाबत आमदार बबनराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयात बैठक झाली. सोमवारपासून (ता. 14) सात दिवस (ता.20) टाळेबंदीचा निर्णय झाला.

मात्र, प्रभारी तहसीलदार चारुशीला पवार यांनी या “कर्फ्यू’शी प्रशासनाचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले. नागरिकांसह व्यापारी-व्यावसायिकांकडून नियमांचे योग्य पालन होत नसल्याने, तालुक्‍यात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे.

या पार्श्‍वभूमीवर तहसील कार्यालयात आज बैठक झाली. बैठकीत 14 ते 20 सप्टेंबरदरम्यान “जनता कर्फ्यू’ लागू करण्याची एकमुखी मागणी करण्यात आली.

प्रभारी तहसीलदार पवार यांनी, “जनता कर्फ्यू’साठी सर्व मदत करण्याचे मान्य करीत प्रशासन सर्वांसोबत असल्याचे सांगितले.

या काळात फक्त मेडिकल, हॉस्पिटल सुरू असतील. किराणासह सर्व दुकाने बंद राहतील. दूध, तसेच पाणीवाटपासाठी सकाळी पाच ते सात व सायंकाळी पाच ते सातपर्यंत परवानगी असेल.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment