एकजूट व्हा, लॉकडाऊन पाळा; आजपासून श्रीरामपूर बंदची हाक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,13 सप्टेंबर 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला. त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

राज्यात ऑक्सीजनची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे उपचाराला मर्यादा येत आहेत. त्यामुळे प्रत्येकाचा जीव वाचविण्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी 8 दिवस आपणहून लॉकडाऊन पाळावा,

एकजूट व्हा, लॉकडाऊन पाळा असे आवाहन काल पालिकेत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आले. आज पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पुन्हा सर्वपक्षीय कोअर कमिटीची बैठक झाली.

त्यामध्ये रविवार दि. 13 ते दि. 20 सप्टेंबर पर्यंत स्वयंस्फुर्तीने शहर बंद ठेवण्याबाबत एकमत होवून शिक्कामोर्तब झाले. या बैठकीस नगराध्यक्षा अनुराधा आदिक, ज्येष्ठ नेते अहमदभाई जहागिरदार,

माजी उपनगराध्यक्ष रवि गुलाटी, भाजपाचे शहराध्यक्ष किरण लुणिया, राम टेकावडे, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी आदी उपस्थित होते. याप्रसंगी व्यापारी असो. चे अध्यक्ष विशाल पोफळे,

अशोक उपाध्ये, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, अहमदभाई जहागिरदार आदींनी श्रीरामपूरच्या हितासााठी मी श्रीरामपूरकर म्हणून या बंदमध्ये सर्व व्यापारी व नागरिकांनी सहभागी व्हावे,

असे आवाहन करतानाच सर्व मिळून हा बंद यशस्वी होईल अशी खात्री असल्याचा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, याला विरोध दर्शवत माजी आ. भानुदास मुरकुटे व माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे

यांनी श्रीरामपूर शहरातील लहान-मोठे व्यावसायिक व व्यापार्‍यांंनी आज रविवार दि. 13 सप्टेंबरपासून आपली दुकाने व व्यवसाय नियमितपणे सकाळी 9 ते सायं.

7 वाजेपर्यंत शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार चालू ठेवावीत. श्रीरामपूर लॉकडाऊनला (बंद) आपला पूर्ण विरोध असून व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंद ठेवू नयेत असे आवाहन केले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment