अकोल्यात २० सप्टेंबरपर्यंत सलग सात दिवस जनता कर्फ्यू पण…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- अकोल्यात सोमवारपासून, तर राजूर येथे बुधवारपासून जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे. वैद्यकीय येवा व औषधांची दुकाने वगळता सर्व व्यवयास बंद असतील.

उल्लंघन केलेले आढळल्यास नागरिक व व्यापारी असोसिएशनकडून दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

यापुढील काळात शासनाकडून लाॅकडाऊनसंदर्भात आदेश येणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असल्यामुळे बहुसंख्य नगरसेवक, व्यावसायिक व नागरिकांनी पुढाकार घेऊन जनता कर्फ्यू पुकारला आहे.

२० सप्टेंबरपर्यंत सलग सात दिवस बंद असेल. मात्र, या निर्णयास अकोल्यातील काही किराणा विक्रेते व छोट्या व्यावसायिकांनी विरोध केला आहे.

२४ सप्टेंबरपासून सर्व दुकानांची वेळ सकाळी ८ ते दुपारी ३ पर्यंत ठेवण्यात येणार असून प्रत्येक दुकानदाराने ग्राहक व स्वतःचे निर्जंतुकीकरण केले पाहिजे. प्रत्येकाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर द्यावा, असे आवाहन अकोले व राजूर येथील व्यापारी असोसिएशनने केले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment