भारतात कोरोना लस कधी येणार ? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :-  सध्या जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. अनेक बळी या आजाराने घेतले असून आर्थिक घडी विस्कटून लावली आहे. आज अनेक देश यावर लस शोधण्यासाठी कार्य करत आहेत. भारतात Oxford-AstraZenecaच्या लशीच्या चाचण्या सीरमच्या मदतीने सुरू आहेत. 

तर Bharat Biotech च्या Covaxin आणि  Zydus Cadilaच्या ZyCoV-D या लशींच्या चाचण्या दुसऱ्या टप्प्यात आहेत. यापैकी एखादी लस 2021च्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये येऊ शकते असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रविवारी सांगितलं.

देशात तयार झालेल्या औषधाचा पहिली डोज घेण्याची आपली तयारी आहे असंही त्यांनी सांगितलं. सोशल मीडियावरून कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला, त्यात त्यांनी ही तयारी दर्शवली. त्यामुळे लोकांमध्ये औषधाविषयी असलेली भीती दूर होईल असंही ते म्हणाले.

तसेच संसदेच्या अधिवेशनाला सोमवारपासून (14 सप्टेंबर) सुरूवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर संसदेत प्रवेश करणाऱ्या सगळ्यांची कोविड चाचणी करण्यात येत आहे. या चाचणीत 5 खासदार पॉझिटिव्ह आले आहेत.

त्यांना आता क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आलं असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, यातील ‘Oxford’ ची लस लवकरच येऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत असतानाच  तिसऱ्या टप्यातल्या चाचण्या सुरू असतांनाच त्या तात्पुरत्या थांबविण्यात आल्या होत्या.

परंतु आता खुशखबर आहे. या लससाठी ब्रिटनच्या Medicines Health Regulatory Authority (MHRA)ने पुन्हा परवानगी दिल्याचं सांगितलं आहे.

या निर्णयाला संशोधनाला मोठा फायदा होणार असून आता भारतासह जगभरात सुरू असलेल्या चाचण्या पुन्हा सुरू होणार आहेत. या औषधाच्या चाचण्या या पूर्णपणे सुरक्षीत असल्याचं MHRAने म्हटलं आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment